Friday, November 25, 2011

A poem from my love for me

स्वःतच्या दुःखात रडत बसण्यापेक्षा
रडणारा चे अश्रूं पुसून तर पाहावे..
घराच्या कोप...र्यात डोक्याला हात लावून
बसण्यापेक्षा
निसर्गाच्या हातात हात देऊन तर बघावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..
माझ्याच वाट्याला हा एकटेपणा म्हणत
राहण्यापेक्षा..
अनाथाचे मन जाणून तर घ्यावे..
पूर्ण न होणार्या स्वप्नात हरवण्यापेक्षा..
सत्य परीस्थितीला अजमावून तर पाहावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..
प्रेयसीच्या प्रेम भंगात देवदास
बनण्यापेक्षा..
आईवडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने तर
आठवावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..
दुसर्याच्या मनाशी खेळ खेळण्यापेक्षा..
स्वःताच्या मनाचा खेळत हरून तर पाहावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते..
अन्याय बघत बसण्यापेक्षा..
जीवनासाठी लढा देऊन तर बघावे..
आठवणीत रमून मनाला त्रास देण्यापेक्षा..
कोणाला सुंदर आठवणी मिळतील का पाहावे..
आयुष्य जास्त सुंदर वाटते

No comments: